लेखा विभाग
लेखा विभागाकडील स.ले.अ./क.ले.अ./ वरी.सहा (लेखा)/कनि.सहा कनि.सहा.निवृत्ती वेतन यांचेकडील कामकाज
सहाय्यक लेखाधिकारी
1. सर्व कार्यालयांची अंतर्गत लेखाविषयक तपासणी. लेखा परिक्षण अनुपालन पडताळणी .
2.सर्व विभागाचे निवीदा विषयक प्रस्ताव तपासणे
3.वित्त प्रेषणाच्या मागणीची वस्तूनिष्ठ पडताळणी.
4.लेखा शाखेवर नियंत्रण व पंचायत समिती स्तरावरील लेखा विषयक कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
5.पंचायत समिती स्तरावरील सर्व आर्थिक व्यवस्था नियंत्रण व देखरेख करणे.
6. ग.वि.अ.यांचे वित्तीय सल्लागार म्हणून कामकाज पहाणे
कनिष्ठ लेखाधिकारी
1.पंचायत समितीकडील पेटीकॅशबुक नमुना नं.4 / नं.7 तपासणी करणे व हिशेबाशी ताळमेळ
तपासणे.
2.सर्व आर्थिक व्यवहाराची तपासणी करणे व वरिष्ठ सहाय्यक (लेखा) यांनी तपासलेल्या बिलांची
छाननी करणे व जमा खर्चाचे हिशेब तपासणे. वेतननिश्चिती प्रकरणे तपासणे.
3.पंचायत समितीच्या अर्थ विभागाकडील लेखा परीक्षण अहवाल तसेच तपासणी अहवालाची
पूर्तता करणे.
4.अर्थ विभागाकडील वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व कनिष्ठ सहाय्यक यांचे कामावर देखरेख.
5.सहाय्यक लेखाधिकारी यांचे अनुपस्थित त्यांचेकडील कामकाज पहाणे.
वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
1.पंचायत समितीकडील सर्व प्रकारची देयके तपासणे.
2.वित्त प्रेषणाची मागणी करणे.
3.धनादेश साठा नोंदवही व सामान्य पावती पुस्तक नोंदवही हिशेब ठेवणे.
4.बँक पास बुक व जनरल कॅश बुक यांचा रोजच्या रोज मेळ घेणे.
5.पंचायत समितीकडील मासिक/वार्षिक जमा खार्चाचे लेखे तयार करणे
6.कनिष्ठ लेखाधिकारी यांचे अनुपस्थितीत त्यांचेकडील कामकाज सांभाळणे.
कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
1.पेटी कॅश बुक यु.डी.आर.,पेमेंट रजिस्टर आदी सर्व नोंदवहया अद्ययावत ठेवणे.
2.वेतनदेयकातून वजावटी होणा-या सर्व रक्कमांचे शेडयुलस,तदसंबंधीचे धनादेश पाठविणे व धनादेश पोहोच अद्ययावत ठेवणे
3.सर्व प्रकारचे चलन्स फाईल्स अद्ययावत ठेवणे.
4.अर्थ शाखेकडे प्राप्त होणारी सर्व देयके स्विकारणे व सदरची देयके नोंदवहीत नोंदविणे.
5. जमा -खर्चाची रजिस्टर्स लिहीणे.
6.अर्थशाखेकडील इतर हिशेबाच्या नोंदवहया लिहीणे.
7.अग्रिम, संकीर्ण, अनामत नोंदवही पूर्ण करणे.
8.महिना अखेर शिर्षकाप्रमाणे शेडयुल तयार करणे.
9. जमा खर्च अभिकरण व हस्तांतरण नोंदवही लिहीणे व अद्ययावत करणे.
10.मासिक,त्रैमासिक व वार्षिक अहवाल पाठविणे.
कनिष्ठ सहाय्यक – निवृत्ती वेतन
1.निवृत्ती वेतन धारकांची सर्व प्रकारची देयके तयार करणे.
3.सेवानिवृत्त कर्मचा-यांचे पी.पी.ओ. व तदसंबंधी सर्व नोंदवहया अद्ययावत ठेवणे.
3.पेन्शन रक्कमा अनुदान मागविणे व रक्कमा वेळेवर बँकेत जमा करणे